सन १९८८-८९ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षांत केशवस्मृति नागरी सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेची स्थापना झाली. पहिल्या काही वर्षात बाल्यावस्थेत असलेली संस्था सन १९९२ नंतर नावारुपास येऊ लागली.
यावर्षी पतसंस्था दि. ०५ नोव्हेंबरला ३५ वर्षे पूर्ण करीत आहे. सुशिक्षित व अनुभवी संचालक मंडळ, कुशल व्यवस्थापन व आत्मीयतेने ग्राहक सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाद्वारे पतसंस्था अविरत प्रगती करीत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचा आजतागायत प्रयत्न करीत आहे. पतसंस्थेने १९९३ मध्ये म.रा.वि. मंडळाकडून वीज बिल स्विकृतीचे अधिकृत केंद्र म्हणून मान्यता मिळवली त्यामुळे सर्वसामान्य लोकांना विजबिल भरणे सोयीचे होऊ लागले.
संस्थेने आपल्या ग्राहकांकरीता विविध योजना कार्यान्वित केल्या त्याचा फायदा संस्थेच्या ग्राहकांना मिळत आहे. काळानुरूप पतसंस्थेने संगणक प्रणाली सुरु केली व ती यशस्वीरित्या कार्यरत आहे. त्यामुळे आर्थिक कामकाज सुलभ, जलदगतीने आणि अचूक होत आहे. सन २०२१-२२ मध्ये संस्थेच्या सर्व शाखा व्यवहाराने जोडल्या असल्याने ग्राहकांना नजीकच्या शाखेत व्यवहार करणे शक्य होत आहे तसेच पतसंस्था ही ISO 9001:2015 हे मानांकन मिळवणारी पनवेलमधील पहिली पतसंस्था आहे.
व्यावसायिक दृष्टीकोन बाळगतांना पनवेल परिसरातील अनेक सामाजिक संस्थांना कृतज्ञता निधीद्वारे आर्थिक मदत पतसंस्था करीत आहे.
पतसंस्थेच्या एकूण ३ शाखा पनवेल शहरात विविध भागांत कार्यरत असल्यामुळे ग्राहकांना सेवा देणे सोयीचे झाले आहे. संस्थेच्या ३५ वर्षाच्या कारकिर्दीत सभासद संख्या ७०३७ इतकी झाली आहे. सन २०२२-२३ ह्या वर्षात संस्थेचा मिश्र व्यवसाय १४१.१८ कोटी पर्यंत गाठण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आगामी काळात २०० कोटींचा टप्पा गाठण्याचे आपले उद्दिष्ट आहे.
पतसंस्थेच्या सर्व शाखांची कार्यालये व मुख्य कार्यालय स्वमालकीचे आहेत. पतसंस्थेत मुख्य कार्यालय व ३ शाखा मिळून २६ कर्मचारीवृंद कार्यतत्परतेने ग्राहकांना सेवा देत आहे. पतसंस्थेचे सर्व ठेवीदार, कर्जदार, सर्व सन्माननीय सभासद, उच्चशिक्षित संचालकमंडळ आणि शिस्तप्रिय कर्मचारी व अधिकारी, स्वल्पबचत प्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळेच संस्थेची प्रगती होऊ शकली आहे. नवनवीन योजनांद्वारे ग्राहकांची आर्थिक उन्नती गाठणे हेच उद्दिष्ट ठेवून पतसंस्था उत्तरोत्तर प्रगती करत राहील.
Branches
Satisfied Customers
Crores Deposits
Crores Loans Disbursed